सांगली । सध्याची राज्यातील,देशातील राजकीय परिस्थिती काय आहे? आपण बघतच आहात. आपण सतर्क राहून आपल्या विचाराच्या पाठीशी ठामपणे उभा रहावे लागेल,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी जुनेखेड (ता.वाळवा) येथील समारंभात बोलताना व्यक्त केला. भाजपासह सर्वच पक्षांच्या कार्यक्रमात आपली तुतारी वाजणार आहे. त्यामुळे तुतारीवर बंदी येण्याची भीती वाटत असल्याचेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले.
जुनेखेड येथे विठ्ठल मंदीरासमोर आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून ५८ लाख रुपयांचा भव्य सभा मंडप बांधण्यात आला आहे. या सभा मंडपाच्या समारंभात ते बोलत होते. यावेळी इनाम पानंद व नाईकबा पानंद च्या सुधारणा कामाचा शुभारंभ,तर सुतार गल्ली,वाडकर गल्लीतील कॉक्रीट रस्त्याचे उदघाटनही करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच प्रियांका पाटील,उपसरपंच सम्राट पाटील,राजारामबापू सह.बँकेचे संचालक धनाजी पाटील,माजी सरपंच प्रा.राहुल पाटील,सुहास पाटील,बाबासाहेब पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी वास्कर सांप्रदायिक भजनी मंडळाचे उत्तमराव पाटील,बाळासाहेब कदम,सुरेश कदम,धनाजी पाटील यांनी आ.पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
आ.पाटील म्हणाले,आपल्या गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य मिळून-मिसळून काम करीत असल्याचा मला आनंद आहे. आपल्या गावात खर्चात बचत करून दर्जेदार व टिकाऊ कामे केली जात आहे,हे कौतुकास्पद आहे. आपल्या गावातील विठ्ठल मंदीर आपल्या गावाच्या अध्यात्मिक चळवळीस गती देईल. आपण विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीबरोबर ज्ञानोबा- तुकोबा मुर्त्या बसविण्याचे स्तुत्य काम केले आहे.
लोकनियुक्त सरपंच प्रियांका पाटील म्हणाले,आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य एकत्रित भावनेने पारदर्शी कारभार करीत गावाच्या विकासाला गती देत आहोत. कोणत्याही ग्रामस्थास घरबसल्या तक्रार नोंदविण्यासाठी संगणक प्रणाली कार्यन्वित केली आहे. आ.जयंत पाटील यांनी गावाच्या विकासाला मोठा निधी दिला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील,शहराध्यक्ष शहाजी पाटील,युवक राष्ट्रवादीचे देवराज देशमुख,जुनेखेडचे विजयराव पाटील,गुलाबराव पाटील,भिमराव गावडे,राजेंद्र पाटील,रणजित पवार,सौ. सविता पाटील,सौ.पद्मश्री पाटील,नवेखेडचे डी.बी.पाटील,प्रदीप चव्हाण,रविंद्र चव्हाण, बालाजी निकम,संताजी गावडे यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रारंभी सुरेश कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपसरपंच सम्राट पाटील यांनी आभार मानले.