सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मनोहर सन्मुख (कासेगाव) व विकास पवार (कुंडल) यांची कामगार संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील व कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील यांच्या हस्ते नूतन कामगार संचालकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यकारी संचालक आर.डी. माहुली,वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी कार्यकारी संचालक आर.डी. माहुली यांनी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कामगार संघटनेच्या पत्राचे वाचन केले. शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी मनोहर सन्मुख यांच्या नावाची सूचना मांडली,त्यास संचालक अमरसिंह साळुंखे यांनी अनुमोदन दिले. सत्यविजय बँकेचे अध्यक्ष व कारखान्या चे संचालक बाळासाहेब पवार यांनी विकास पवार यांच्या नावाची सूचना मांडली. त्यास संचालक रघुनाथ जाधव यांनी अनुमोदन दिले. दोन्ही निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या.
याप्रसंगी संचालक प्रदीपकुमार पाटील,प्रतापराव पाटील,दादासाहेब मोरे,शैलेश पाटील,रामराव पाटील,दिपक पाटील,अतुल पाटील,हणमंत माळी,राजकुमार कांबळे, दिलीपराव देसाई,वैभव वसंतराव रकटे, संचालिका सौ.मेघा पाटील,प्रा.डॉ.योजना शिंदे-पाटील,कारखान्याचे सचिव डी.एम. पाटील,मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.