सांगली । चिकुर्डे (ता.वाळवा) येथील किशोर चंद्रकांत भोसले याची १७ वर्षाखालील महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली आहे. हा संघ पाटणा (बिहार) येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे.शिरपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडाधिकारी यांनी घेतलेल्या निवड चाचणी स्पर्धेत ही निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल किशोर भोसले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
किशोर हा कोल्हापूर येथील आयुर्विन हायस्कुलमध्ये इयत्ता ९ वीमध्ये शिकत आहे.तो गेल्या ३ वर्षापासून पारगाव येथील विंग्ज स्पोर्टस अकॅडमीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे.त्याला विंग्ज स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रोहित डंबे,मुख्य प्रशिक्षक प्रथमेश डंबे,राजेश केलवळकर,राजेश ओझा,आयुर्विन हायस्कुल चे क्रीडा शिक्षक पॉल सुर्यवंशी यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाले आहे. तसेच त्याचे वडील चंद्रकांत भोसले,आई भारती भोसले,आविष्कार कल्चरल ग्रुपचे माजी खजिनदार धनंजय भोसले यांचे प्रोत्साहन मिळले आहे.