सांगली । जिल्ह्यातील गोटखिंडी गावातील साद माणुसकीची सेवाभावी संस्थेच्या प्रबोधनपर व्याख्यान सत्रात स्थानिक वक्त्यांनी धमाल केली.श्रोत्यांनी त्यांना जोरदार प्रतिसाद दिला.
त्याचे असे झाले,
शनिवारपासून२०,२१,२२ जानेवारीला व्याख्यान सत्र होते.रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी आजारी असताना आले.चला गाव घडवू या या विषयावर तळमळीने बोलले.स्वयंसेवी संस्थांनी गाव विकासात पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.रविवारी डॉक्टर संजय कळमकर यांनी आपल्या खेळकर शैलीत जीवनातील आनंद कसा शोधावा ही सूत्रे विशद केली.
सोमवारी सागर बोराटे यांचे कीर्तन होते.पण नातेपुते येथील कार्यक्रमात हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी करताना वाऱ्याने मांडव मोडला.कार्यकर्त्यांनी सर उशीर झाला तरी या असा निरोप दिला.आणि स्थानिक वक्ते पुढे सरसावले.निवृत्त पोलीस अशोक रंगराव पाटील यांनी अध्यात्म विवेचन केले.प्रमोद स्वामी यांनी राम कथा सांगितली.डॉक्टर संचिता सचिन शिंगटे यांनी महिलांचे आरोग्य या विषयावर विवेचन केले.नामदेव पाटील,भीमराव मोरे,प्रकाश पाटील बोलले.सागर बोराटे सर रात्री पावणे नऊ वाजता आले.तोपर्यंत स्थानिक वक्ते आणि श्रोत्यांनी कमी तिथं आम्ही ही भूमिका बजावली.
अल्पावधीत श्रोता प्रिय बनलेल्या या व्याख्यान सत्रात व्यासपीठावर फक्त प्रमुख पाहुणे असतात. संयोजक श्रोत्यांत विसावतात. श्रोत्यांना उत्तम बैठक व्यवस्था असते.लोकवर्गणीची life line मजबूत आहे.श्रोत्यांच्याउत्तम प्रतिसादाने वक्ते सुखावतात.