राष्ट्रपतींच्या हस्ते 09 जानेवारी 2024 रोजी दिले जाणार पुरस्कार
नवी दिल्ली | युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 जाहीर केले.राष्ट्रपती भवन येथे 9 जानेवारी 2024 (मंगळवार) रोजी सकाळी 11. 00 वाजता आयोजित विशेष कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 बॅडमिंटनपटू चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि रंकीरेड्डी सात्विक साई राज यांना प्रदान करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील नैपुण्याचा सन्मान करण्यासाठी प्रदान केले जातात.
‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ खेळाडूला मागील चार वर्षांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो.
खेळांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार’ खेळाडूला मागील चार वर्षांच्या कालावधीतील चांगल्या कामगिरीसाठी आणि नेतृत्व, खिलाडूवृत्ती आणि शिस्तपालन यासाठी दिला जातो.
‘उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार’ क्रीडाप्रशिक्षणात सातत्याने उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सक्षम करणाऱ्या प्रशिक्षकांना दिला जातो.
क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, क्रीडा क्षेत्रात आपल्या कामगिरीने योगदान देणाऱ्या आणि निवृत्तीनंतरही खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सतत योगदान देणाऱ्या खेळाडूंना प्रदान केला जातो.यंदा या पुरस्कारांसाठी मंजुषा कंवर, विनीत कुमार शर्मा आणि कविता सेल्वराज यांची निवड करण्यात आली आहे.
वर्ष 2023 मध्ये खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यात तिरंदाज ओजस देवतळेचा समावेश आहे.
उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार 2023 मध्ये मलखांब प्रशिक्षक गणेश देवरुखकर यांचा समावेश आहे.
आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये सर्वांगीण उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) चषक दिला जातो. यंदा अमृतसरचे गुरू नानक देव विद्यापीठ या चषकाचे मानकरी ठरले आहे.
अर्ज ऑनलाइन मागवण्यात आले होते आणि खेळाडू/प्रशिक्षक/संस्था यांना समर्पित ऑनलाइन पोर्टलद्वारे स्व-अर्ज करण्याची परवानगी होती. यावर्षी या पुरस्कारांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज/नामांकने प्राप्त झाली होती. सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमध्ये प्रख्यात खेळाडू, क्रीडा पत्रकारितेचा अनुभव असलेल्या व्यक्ती आणि क्रीडा प्रशासक यांचा समावेश होता.
समितीच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य छाननीनंतर, सरकारने खालील खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांना पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे:
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023
1. चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन)
2. रँकीरेड्डी सात्विक साई राज (बॅडमिंटन)
1. Chirag Chandrashekhar Shetty (Badminton)
2. Rankireddy Satwik Sai Raj (Badminton)
2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार
1. ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी)
2. अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी)
3. श्रीशंकर एम (अॅथलेटिक्स)
4. पारुल चौधरी (अॅथलेटिक्स)
5. मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग)
6. आर वैशाली (बुद्धिबळ)
7. मोहम्मद शमी (क्रिकेट)
8. अनुष अग्रवाला (अश्वस्वार)
9. दिव्यकृती सिंग (अश्वस्वार ड्रेसेज)
10. दिक्षा डागर (गोल्फ)
11. कृष्ण बहादूर पाठक (हॉकी)
12. पुक्रंबम सुशीला चानू (हॉकी)
13. पवन कुमार (कब्बडी)
14. रितू नेगी (कब्बडी)
15. नसरीन (खो-खो)
16. सुश्री पिंकी (लॉन बाऊल्स)
17. ऐश्वरी प्रताप सिंग तोमर (शूटिंग)
18. सुश्री ईशा सिंग (नेमबाजी)
19. हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश)
20. अहिका मुखर्जी (टेबल टेनिस)
21. सुनील कुमार (कुस्ती)
22. सुश्री अँटिम (कुस्ती)
23. नौरेम रोशिबिना देवी (वुशू)
24. शीतल देवी (पॅरा तिरंदाजी)
25. इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट)
26. प्राची यादव (पॅरा कॅनोइंग)
Arjuna Awards for outstanding performance in Sports and Games 2023
1. Ojas Pravin Deotale (Archery)
2. Aditi Gopichand Swami (Archery)
3. Sreeshankar M (Athletics)
4. Parul Chaudhary (Athletics)
5. Mohameed Hussamuddin (Boxing)
6. R Vaishali (Chess)
7. Mohammed Shami (Cricket)
8. Anush Agarwalla (Equestrian)
9. Divyakriti Singh (Equestrian Dressage)
10. Diksha Dagar (Golf)
11. Krishan Bahadur Pathak (Hockey)
12. Pukhrambam Sushila Chanu (Hockey)
13. Pawan Kumar (Kabbadi)
14. Ritu Negi (Kabbadi)
15. Nasreen (Kho-Kho)
16. Ms Pinki (Lawn Bowls)
17. Aishwary Pratap Singh Tomar (Shooting)
18. Ms Esha Singh (Shooting)
19. Harinder Pal Singh Sandhu (Squash)
20. Ayhika Mukherjee (Table Tennis)
21. Sunil Kumar (Wrestling)
22. Ms Antim (Wrestling)
23. Naorem Roshibina Devi (Wushu)
24. Sheetal Devi (Para Archery)
25. Illuri Ajay Kumar Reddy (Blind Cricket)
26. Prachi Yadav (Para Canoeing)
उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार
1. ललित कुमार (कुस्ती)
2. आर.बी. रमेश (बुद्धिबळ)
3. महावीर प्रसाद सैनी (पॅरा अॅथलेटिक्स)
4. शिवेंद्र सिंग (हॉकी)
5. गणेश प्रभाकर देवरुखकर (मल्लखांब)
Dronacharya Award for outstanding coaches in Sports and Games 2023
1. Lalit Kumar (Wrestling)
2. R. B. Ramesh (Chess)
3. Mahaveer Prasad Saini (Para Athletics)
4. Shivendra Singh (Hockey)
5. Ganesh Prabhakar Devrukhkar (Mallakhamb