मऱ्हाट मोळ्या गाण्यांसह हिंदी गाण्यांची बरसात : इस्लामपुरात रंगला ‘आविष्कार’ चा संगीत महोत्सव
सांगली । मऱ्हाटमोळ्या रोहित राऊत व जुईली जोगळेकर या जोडीने एकापेक्षा एक सरस अस्सल मराठी गाणी सादर करून इस्लामपूर कर कला रसिकांना अक्षरशः खिळवून सोडले…आविष्कार कल्चरल ग्रुपच्या २१ व्या संगीत महोत्सवातील तिसरा (शेवटच्या) कार्यक्रम आघाडीचा युवा गायक रोहित राऊत आणि आघाडीची युवा गायिका जुईली जोगळेकर यांच्या ‘आरजे लाईव्ह कॉन्सर्ट’ने संपन्न झाला…माजी मंत्री आ. जयंतराव पाटील,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्यासह पाच हजार कलारसिकांनी या जोडीच्या गाण्यांचा आनंद लुटला…
इस्लामपूर येथील खा.एस.डी.पाटील नगरातील विद्यामंदीर हायस्कुलच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोहित व जुईली या जोडीने झिंग झिंग झिंगाट,जवा नवीन पोपट हा,शिट्टी वाजली, पिंजरा बनाया सोने का,बायो ग बायो,डोकं फिरलया,कोंबडी पळाली,मला वेड लागले प्रेमाचे,आयुष्य हे,खेळताना रंग बाई होळीचा,चंद्रा,वाजले की बारा,खंडेरायाच्या लग्नाला,नदीच्या पल्याड, पुढे हलगी वाजती यांच्यासह अनेक मऱ्हाट मोळ्या गाण्यासह काही हिंदी गाणीही सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
नवोदित गायक मनिष जाधव याने श्री गणेशा,डौल मोराच्या मानेचा,आली ठुमकत,ग साजनी,आज जाने की जिद ना कर आदी गाणी सादर केली. सत्यजित वाघमारे, आदिनाथ पाटकर,सुर्या,मोहित,प्रतिक गवळी, आदेश मोरे या वादकांनी त्यांना साथ केली.
प्रारंभी नेताजीराव पाटील,विनायक पाटील,अँड.धैर्यशिल पाटील,एस.डी.कोरडे, विकास कर्डिले यांच्या हस्ते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कविवर्य प्रा.प्रदीप पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषणात २२ वा संगीत महोत्सव फेब्रुवारीत घेत असल्याची घोषणा केली.
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते कलाकार, तसेच सईद पिरजादे,चंद्रसेन सव्वासे यांचा सत्कार करण्यात आला. विजयराव पाटील, शहाजी पाटील,सुस्मिता जाधव,सभापती शुभांगी पाटील,संजय पाटील,छाया पाटील, बाळासाहेब पवार,अँड.विश्वासराव पाटील, आर.डी.माहुली,डॉ.सतिश गोसावी यांच्यासह वाळवा,शिराळा व पलूस तालुक्यातील कला रसिकांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
आविष्कारचे मार्गदर्शक मोहन चव्हाण, सुनिल चव्हाण,विश्वनाथ पाटसुते,प्रा.प्रदीप पाटील,भूषण शहा,विजय लाड,प्रा.कृष्णा मंडले,नजीर शेख,राजेंद्र माळी,शेखर गायकवाड,राजवर्धन लाड,सौरभ सावंत, हर्षवर्धन घोरपडे,श्रेयस पाटील,विश्वास कदम,धनंजय भोसले,राजवर्धन लाड,लव्हाजी देसाई,संतोष पाटील,अजय थोरात, सचिन शिंगटे यांच्यासहआविष्कारच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले.