Last Updated on 02 Dec 2023 8:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राजापूर । गावपातळीवरील कोणत्याही विकासकामांचे शुभारंभ बहुतांश वेळा तालुक्यातील मंत्री,आमदार-खासदार किंवा एखाद्या स्थानिक नेत्याच्या हस्ते होतात.पण, तुळसवडे (ता.राजापूर) येथील विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी स्थानिक गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या शिफारशीनुसार रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन योजनेमधून जनसुविधा कार्यक्रम अंतर्गत तुळसवडे गावातील वडाचा माळ येथे स्मशानभूमी शेड मंजूर करून दिली.त्याचा भूमिपूजन सोहळा आज गावकऱ्यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत,माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत,जिल्ह्याचे उद्योगरत्न किरणभैया सामंत यांचे निधी मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक आदिनाथ कपाळे यांनी आभार मानले.
सदर कार्यक्रमाला गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.










































































