राष्ट्रीय खेळाडू प्रणाली वडार, मानसी पवार, संस्कृती माने या खेळाडुंचा समावेश
सांगली । अहमदनगर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत इस्लामपूर येथील विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स इस्लामपूर कॉलेजने 19 वर्षाखालील मुलींच्या गटात ब्राँझ पदक मिळविले.
या संघांमध्ये प्रणाली वडार,मानसी पवार,संस्कृती माने यांचा समावेश आहे.एकेरी मध्ये राष्ट्रीय खेळाडू प्रणाली प्रकाश वडार हिने विरुद्ध संघाच्या संस्कृती सातारकर हिच्या बरोबर अत्यंत चुरशीच्या सामन्यात प्रणालीने 15-8,10-15,15-10 अशा फरकाने तीन सेट मध्ये पराभूत करून विजय खेचून आणून आपल्या कॉलेजला ब्राँझ पदक प्राप्त करून दिले.तसेच दुहेरी मध्ये प्रणाली वडार, मानसी पवार व संस्कृती माने यांनी 15-6, 15-8 अशा फरकाने विजय मिळविला.
संस्थेचे मानद सचिव अॅड. बी. एस. पाटील, सहसचिव अॅड. धैर्यशील पाटील, प्राचार्य एस.एल. पाटील,प्रा. डॉ. एच.ए. नारायणकर,प्रा. संदीप साळुंखे आणि खासदार एस.डी. पाटील बॅडमिंटन अकॅडमीचे प्रशिक्षक,राष्ट्रीय खेळाडू सुदर्शन वडार यांनी या तिघींचे अभिनंदन केले.
या खेळाडुंना तिचे पालक प्रकाश वडार,सुनील माने,सरिता माने यांचे प्रोत्साहन लाभले त्यांच्या यशाबदृल तिघींचे अभिनंदन होत आहे.महाजलतरण ग्रुपच्यावतीने संस्कृती माने हिचा सत्कार करण्यात आला.यावेळी उद्योजक संजय पाटील,वैद्यकीय अधिक्षक डॉ. नितीन चिवटे,इस्लामपूर न्यायालयातील अधिक्षक संजय जाधव,जयवंत निगडकर,प्रशांत वाजे,विजय पाटील,अभिजित शिंदे,नंदू परिट,अवधूत पेठकर,अविनाश जाधव,भानूदास वरेकर,सयाजी पवार आदी उपस्थित होते.