सांगली । ऊसदर प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बहे (ता. वाळवा) कृष्णानदी पुलाजवळ दोन दिवस आंदोलन केले.त्यावेळी तांबवे येथील वयोवृद्ध शेतकरी शंकर हरी पाटील (आण्णा) यांनी ऊसदर प्रश्नावर रोखठोक भूमिका मांडली.कुठं गेलं पैसं,हिशोब करा…का आमच्यावर…? अशी रोखठोक भूमिका मांडतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होत आहे.या व्हिडिओची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे.
जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेले ऊसदर आंदोलन चिघळले आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठीकठिकाणी ऊस वाहतूक रोखून धरली आहे.काही वाहनांच्या टायरमधील हवा सोडली जात आहे.तर काही ठिकाणी ऊस तोडी बंद पाडल्या जात आहेत.त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेती अधिकाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत.संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कालपासून अनेक ठिकाणी ऊसाने भरलेली वाहने रोखून धरली आहेत.मागील हंगामातील 400 रुपये आणि चालू हंगामातील 3 हजार 500 रुपये दर मिळावा यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम असून संघटनेने सोमवारपासून अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे.
हेही वाचा – सांगली,कोल्हापूर जिल्ह्यात ऊस गाळपाची चाके मंदावली; ऊसदर आंदोलनाचा फटका
बहे तांबवे पुलाजवळ कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवस रोखून धरली होती.त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तांबवे गावचे शिवाजी पाटील,भागवत जाधव,शहाजी पाटील,सर्जेराव पाटील,संतोष शेळके,प्रविण पाटील,प्रदीप पाटील,मालोजी शिंदे यांच्यसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी तांबवेचे वयोवृद्ध शेतकरी शंकर हरी पाटील (आण्णा) हेही सहभागी झाले होते.ते ठिवसभर रस्त्यावर ठाण मांडून बसले होते.यादरम्यान त्यांनी ऊसदर प्रश्नी मांडलेल्या भूमिकेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होत आहे.
काय करायचं आम्ही,सहा वर्षे झालं तीन हजारच देत्याती,मळीचं नाह्यती, दारूचं पैसं नाह्यती,बगॅस नाय,अल्कोहोल नाय…कुठं गेलं पैसं…का फक्त एफआरपी असे अनेक सवाल करत वयोवृद्ध शेतकरी पाटील यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.अशी रोखठोक भूमिका मांडतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होत आहे.या व्हिडिओची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे.
यावेळी साखर कारखान्याच्या रोखठोक भुमिका मांडलेला आणि समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पहा :
कारखान्याच्या अधिकाऱ्यांशी पोटतिडकीने बोलताना…व्हायरल व्हिडीओ