प्रा. अशोक शिंदे,प्रा. संजय थोरात,प्रा. कृष्णा मंडले,प्रा. मंगल पाटील हे पुरस्काराचे मानकरी
सांगली : शिक्षक दिनानिमित्त जायंटस ग्रुप ऑफ इस्लामपूर सहेलीच्यावतीने चार आदर्श शिक्षकांची निवड अध्यक्ष श्रीमती सुनीता सपकाळ यांनी केली. जायंटस आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. संजय थोरात,प्रा. अशोक शिंदे,प्रा. कृष्णा मंडले,प्रा. मंगल यशवंत पाटील यांना जाहीर झाला आहे.
देशाचे दुसरे राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शैक्षणिक कामाबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या शिक्षकांचा जायंटस आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सन २०२१ साठी आदर्श शिक्षक म्हणून प्रा.डॉ.संजय थोरात यांना समाज प्रबोधनपर लेखन, व्याख्यान, वाचन चळवळ या कार्यासाठी वाचन चळवळीतला अग्रगण्य सहभाग व दीर्घकाळ पत्रकारिता अशा विविध उपक्रमशील कार्याबद्दल गौरविण्यात येणार आहे.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा.अशोक शिंदे यांना अपंग निराधार कुटुंबांना मदत, माणुसकीचे नाते या सामाजिक संस्थेतील विशेष कार्य, पत्रकारिता, अध्यात्मिक अभ्यास, सामाजिक प्रबोधन या कार्याबद्दल गौरविण्यात येणार आहे.
मॉडर्न हायस्कूल साखराळे येथे कार्यरत असणारे प्रा. कृष्णा मंडले यांना विद्याथ्र्यांना उच्च शिक्षणासाठी सहकार्य, सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम, राजस व्याख्यानमाला, पूरग्रस्त छावणीचे संकलन, ग्रंथालय चळवळ, प्रासंगिक लेखन आणि सांस्कृतिक सहभाग, तसेच पतसंस्थेच्या माध्यमातून गरजूना आर्थिक सहकार्य या विशेष कार्याबद्दल गौरविण्यात येणार आहे.
यशवंतराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज देवराष्ट्र येथे कार्यरत असणाऱ्या प्रा. मंगल यशवंत पाटील यांना कविता लेखन, निबंध लेखन कार्यशाळा, विविध विषयांवर समाज प्रबोधनपर व्याख्यान, | शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना व्याख्याने,व्याकरण व वाङमयीन इतिहासाचे मार्गदर्शन १९९४ पासून सेवेत या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात येणार आहे.
इस्लामपूर शहर परिसरामध्ये या शिक्षकांनी उल्लेखनीय कार्य करत समाज प्रबोधनहीं करत आहेत. अशाच प्रतिभावान शिक्षकांमुळे देशातील भावी पिढी सक्षम घडत आहे. विद्याथ्र्यांचा सर्वांगीण विकास साध्य करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान यातून होत आहे. यासाठी जायंटस सहेलीने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले. याप्रसंगी सहेलीच्या अध्यक्षा सुनीता सपकाळ, कार्यवाह रचना शिंदे, माजी अध्यक्षा संगीता शहा, कविता शहा, प्रतिभा शहा, श्रद्धा कुलकर्णी, प्रफुल्लता शहा, चारशीला फल्ले, विद्या पाटील, प्रिया बोंगाळे, सीमा भूतकर उपस्थित होते.