Last Updated on 05 Nov 2023 8:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथील एस.डी.पाटील शूटिंग रेंज व विद्यामंदिर हायस्कुलची (इयत्ता 11 वी सायन्स) खेळाडू संस्कृती सुनील माने हिने कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय शूटिंग स्पर्धेत 19 वर्षाखालील गटात ओपन साईट रायफल प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला.तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या आधी तिने बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता.त्याही स्पर्धेत तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

शूटिंग स्पर्धेत यश मिळविलेली विद्यामंदिरची खेळाडू संस्कती सुनील माने.सोबत तिचे प्रशिक्षक नईम नरदेकर.
तिला क्रीडा शिक्षक संदीप साळुंखे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे क्रीडा संचालक हेमंत नारायणकर,शूटिंग रेंजचे प्रशिक्षक नईम मुबारक- नरदेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे सह सचिव धैर्यशील पाटील,अॅड. बी. एस. पाटील यांनी तिचे अभिनंदन केले.










































































