Last Updated on 02 Nov 2023 10:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
दिनांक 4, 5 , 25 , 26 नोव्हेंबर 2023 या दिवशी विशेष मोहिम
सांगली । केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार,एक जानेवारी २०२४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांची मतदार नोंदणी व मतदार यादी पुनर्निरीक्षण केली जात आहे.त्याअंतर्गत दि. 4 नोव्हेंबर,दि. 5 नोव्हेंबर,दि. 25 नोव्हेंबर व दि. 26 नोव्हेंबर 2023 या दिवशी होणा-या विशेष मोहिमांमध्ये सर्व मतदारांनी उस्फूर्तपणे सहभाग घेवून मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी 283 इस्लामपुर व 284 शिराळा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने दि. 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधरित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.या कार्यक्रमाअंतर्गत दि.04 नोव्हेंबर दि.05 नोव्हेंबर, दि. 25 नोव्हेंबर व दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी विशेष मोहीम आयोजित करणे बाबतच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत.
या अनुषंगाने दि.04 नोव्हेंबर, दि.05 नोव्हेंबर, दि. 25 नोव्हेंबर व दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे सकाळी 10.00 ते 05.00 या वेळेत त्यांना नेमून देलेल्या मतदान केंद्रावर थांबून,पात्र व्यक्तीकडून नमुना 6, 7 व 8 चे अर्ज भरून घेणार आहेत.या विशेष मोहिमे अंतर्गत तालुक्यातील 18 वर्ष वय पूर्ण असणाऱ्या परंतु ज्यांचे मतदार यादी मध्ये नांव नाही,अशा सर्व मतदारांची नोंदणी करणेत येणार आहे. मयत तसेच स्थलांतरीत मतदार यांच्या नांवाची वगळणी करणेत येणार आहे
तसेच मतदारांच्या नांव,वय,पत्ता यांचे मध्ये दुरुस्ती असलेस,दुरुस्ती करणेत येणार आहे.तरी मतदार यादीमध्ये नवीन नांवाची नोंद करणे,मतदार यादीतील नांव वगळणे व नांव,वय, पत्ता,फोटो यामध्ये दुरुस्ती करणे इत्यादी करीता अनुक्रमे नमुना नंबर 6,7 व 8 चे फॉर्म भरून आपले भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे देणेत यावेत.
दि. 4 नोव्हेंबर, दि.5 नोव्हेंबर,दि. 25 नोव्हेंबर व दि. 26 नोव्हेंबर 2023 या दिवशी होणा-या विशेष मोहिमांमध्ये सर्व मतदारांनी उस्फूर्तपणे सहभाग घेवून मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी 283 इस्लामपुर व 284 शिराळा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी केले आहे.












































































