Last Updated on 02 Nov 2023 1:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । उसाला 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या दिवशीही आंदोलनाची धग कायम होती.बुधवारी दुपारी कृष्णा व राजारामबापू कारखान्याकडे जाणारे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखले.तर त्यातील पाच ट्रॅक्टरची हवा सोडली.
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कृष्णा कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर आज बुधवारी दुपारी बहे-इस्लामपूर रस्त्यावर स्वाभिमानीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कृष्णा व राजारामबापू कारखान्याकडे जाणारे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखले.एम.आय.डी.सी. जवळ साखराळे येथील माने मळ्याजवळ ऊस ट्रॅक्टरच्या टायरी फोडल्या.तर हुबालवाडी हदीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड बंद पाडली नरसिंहपूर परिसरातही राजारामबापू पाटील कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरची हवा सोडली.
यावेळी भागवत जाधव,जगन्नाथ भोसले,अँड.एस.यु. संदे,आप्पासाहेब पाटील,प्रभाकर पाटील,पंडित सपकाळ शहाजी पाटील,प्रताप पाटील,प्रदीप पाटील,सचिन यादव,विलास यादव,शामराव जाधव रविकिरण माने सह कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देऊ
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव म्हणाले,माजी खासदार राजू शेट्टी यांनी मराठा आरक्षणासाठी पदयात्रा तात्पुरती स्थगित केली आहे.याचा अर्थ ऊस आंदोलन बंद असे नाही.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू ठेवले आहे.यंदा कमी पाऊसमान असल्याने साखर कारखाने 80 ते 85 दिवस चालणार आहेत.शेतकऱ्यांनी थोडी दिवस कळ सोसावी यंदा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देऊ.












































































