ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना सर्वसामान्य ग्रामस्थांना बसता येते.ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा म्हणून राज्य शासनाने १९ सप्टेंबर १९७८ रोजी काढलेल्या शासकीय परिपत्रकानुसार जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या मासिक सभांमध्ये सर्वसामान्य ग्रामस्थांना उपस्थित राहता येते.
मासिक सभांमध्ये सर्वसामान्य ग्रामस्थांना उपस्थित राहता यावे,यासाठी काहींनी जानेवारी २०१३ पासून लढा उभारला.त्याला २०२१ मध्ये यश आले. ग्रामपंचायतीच्या सभेबाबत महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र. पीआरसी २०००/ २७०३/ सीआर (२०३२) दि. १९/९/१९७८ व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील मुंबई ग्रामपंचायत (सभा) बाबत नियम १९५९ (क. १०६ (२) खंड (७) मधील नियम १ टीप १ मधील ग्रामसभांना उपस्थित राहण्याबाबत तरतुदी या स्वयंस्पष्ट आहेत.त्यामुळे सर्व ग्रामपंचायतीमधील ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांना उपस्थित राहता येणार असून,भ्रष्टाचाराचे प्रमाण घटण्यास मदत होणार आहे.
मासिक सभांना उपस्थित राहण्यासाठी असा करा अर्ज…
प्रथम एक अर्ज,आपल्या,ग्रामपंचायत कार्यालय,गट विकास अधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जिल्हा परिषद यांना खालीलप्रमाणे करा!
सर्वसामान्य नागरिक व ग्रामस्थांना मासिक सभेमध्ये बसण्याबाबत…
विनंती अर्ज
प्रति,
मा ग्रामविकास अधिकारी,
ग्राम पंचायत………………………….
ता……………………………….जि……………………………….
पिन :
अर्जदार :-……………………….
मु.पो:…………..ता…………….जि………….. पिन-
विषय :- ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत बसण्यास परवानगी मिळण्याबाबत…
संदर्भ :-१) महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग परिपत्रक क्रमांक -पीआरसी १०७७/२७०३/सीआर (२७३२) दिनांक ११/०९/१९७८
२) महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ मधील मुंबई ग्रामपंचायत ( सभांबाबत ) नियम १९५९ [क. १७६ (२), खंड (७)] १, टीप १ मधील तरतूदी
३) जिल्हा परिषद पालघर यांचे दिनांक १६/०४/२०१९ चे पत्र जावक क्रमांक पाजिप/ग्रापं/कार्या १/वशी-३२४
४) महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग पत्र जावक क्रमांक व्हीपीएम २०२१/प्र.क्र ६१/पंरा ३,दिनांक -०१ मार्च २०२१
महोदय,
उपरोक्त संदर्भीय पत्राद्वारे मी अर्जदार श्री……………………..
मु……………..पो/……………..ता……………….जि……………आहे कि, संदर्भ क्रमांक १ – आपणांस विनंती करत शासन परिपत्रक क्र पीआरसी १०७७/२७०३/सीआर (२७३२) दिनांक११०९/१९७८ व संदर्भ क्रमांक २,
मुंबई ग्रामपंचायत (सभांबाबत ) नियम १९५९ [ क. १७६ (२), खंड (७)] नियम १, टीप १ मधील तरतूदी प्रमाणे ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या मासिक मिटिंग ( सभांना) बसण्याचे जे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत,त्यानूसार ग्रामपंचायतीच्या मासिक मिटिंग (सभांना) बसण्यास परवानगी मिळण्याबाबत मी आपल्या कार्यालयाकडे विनंती अर्ज सादर करत आहे.
तरी महोदय, सबंधित शासन परिपत्रक व अधिनियमातील तरतूदी प्रमाणे माझ्या विनंती अर्जावर कार्यवाही करून मला ग्रामपंचायतीच्या मासिक मिटिंग/सभांना बसण्यास परवानगी मिळावी.
तसेच संबंधित मासिक सभा/मिटिंग या बाबत मला किमान १ दिवस आधी पूर्व सूचना दिली जावी ही नम्र विनंती.
आम्ही भारताचे लोक
अर्जदाराची
सही……………………………..
नाव……………………………..
मो.नं.
Email-ID:-
एक भारतीय नागरिक
ग्रामस्थ
मासिक सभांना उपस्थिती बाबतचा आदेश PDF मध्ये
👇👇👇👇
ग्रामपंचायत_मासिक_सभेत_ग्रामस्थांना_प्रवेश_
मासिक सभांना उपस्थित राहण्यासाठीचा अर्ज PDF मध्ये
👇👇👇👇
मासिक सभांना उपस्थिती बाबतचा अर्ज PDF मध्ये