पृथ्वीसाठी धोक्याची घंटा : 200 शास्त्रज्ञांचा दावा
येणाऱ्या 20 वर्षात जागतिक तापमानवाढीचा दर 1.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक वाढण्याची चिन्ह आहेत.भविष्यातील तापमान वाढीमुळे नैसर्गिक जगाला हानी पोहोचू शकते.अशावेळी जमीन आणि समुद्र या परिसंस्था वातावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी अपुऱ्या पडतील असे संयुक्त राष्ट्राच्या इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.
या वर्षी 9 जुलै रोजी कॅनडात पहिल्यांदा पारा 49.6 अंशांवर पोहोचला. भीषण उकाड्यामुळे लोक हैराण झाले होते. तर दुसरीकडेच त्याच दिवशी अमेरिकेच्या उत्तर कॅलिफोर्निया सीमेवर 4 लाख एकरपेक्षा जास्त जंगलाच वणवा पेटला होता. न्यूझीलंडमध्ये इतका बर्फ पडला की रस्ते बंद झाले. घरातून बाहेर पडण्यास बंदी घातली गेली.
हवामानाच्या या विलक्षण बदलावर 60 देशांतील 200 शास्त्रज्ञांनी संशोधन केले आणि 3,500 पानांचा अहवाल लिहिला. सात वर्षांच्या अभ्यासानंतर, जेव्हा या अहवालाला नाव देण्याची वेळ आली, तेव्हा शास्त्रज्ञांनी त्याला मानवी जीवन धोक्याच्या लाल पातळीवर पोहोचले आहे असे म्हटले आहे.
या संशोधनातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हवामानाची अत्यंत वाईट परिस्थिती.अभ्यासानुसार, भूस्खलन, मुसळधार पाऊस, ढगफुटी,चक्रीवादळ, गारपीट, पूर किंवा तीव्र दुष्काळ यासारख्या आपत्ती जी 50 वर्षांतून एकदा येते असते, 2100 सालापर्यंत दरवर्षी येईल.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात कॅनडाचे तापमान जे सरासरी 16.4 अंश सेल्सिअस असते, ते 49.6 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. याचे कारण उष्णतेची लाट होती. शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे, कार्यालये, लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली होती. कॅनडातील व्हँकुव्हर, पोर्टलँड, इडाहो, ओरेगॉनच्या रस्त्यांवर वॉटर स्प्रिंकलर मशीन बसवण्यात आली. आगीच्या भीतीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
जागतिक हवामान बदलास मनुष्यही कारणीभूत असून त्याच्या हस्तक्षेपामुळे 1970 पासून सागरी तापमानवाढ, त्याचबरोबर पृथ्वीच्यागोठलेल्या भागात बदल आणि समुद्राच्या आम्लीकरणास सुरुवात झाली आहे.
भारतातील 12 शहरे 3 फूट पाण्याखाली जाणार आहेत,त्यात मुंबईचा समावेश आहे
आयपीसीसी अहवालाचा हवाला देत नासाने भारतातील सुमारे 12 शहरे 3 फूट पाण्याखाली जाणार असल्याचे सांगितले आहे. नासाने म्हटले आहे की, जगभरातील मनुष्य जिथे राहतात त्याचे क्षेत्र कमी होणार आहे, कारण समुद्राचे पाणी वाढेल.यात भारतातील ओखा, मोरमुगाओ, कांडला, भावनगर, मुंबई, मंगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम, तुतीकोरन, कोच्ची, पारादीप आणि पश्चिम बंगालमधील किद्रोपूर किनारपट्टीचे क्षेत्र 3 फूट पाण्याखाली जाईल.
या अहवालात ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी उपाययोजना देखील सांगितल्या आहेत. ज्यात स्पेसमध्येजमा होणारे कार्बन कमीकरण्यावर भर दिला पाहिजे. सोबतच नेट झिरो आणि इतर ग्रीनहाऊस गॅसेस कमी केले पाहिजेत. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कमीतकमी कार्बन उत्सर्जनमध्ये देखील जागतिक तापमानवाढ होणारच आहे. अशात ह्या तापमानवाढीसोबतच जगण्यासाठीच्या उपाययोजनादेखील करायला हव्यात.
नेट झिरो गाठण्यासाठी ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजेच हरित वायू उत्सर्जन शक्य तेवढे कमी करावे लागणार आहे. त्यासाठी प्रदूषण न करणारे तंत्रज्ञान वापरणे, उर्वरित उत्सर्जन कार्बन कॅप्चर आणि स्टोरेजच्या माध्यमातून उर्वरित उत्सर्जन टाळणे किंवा जास्तीत जास्त झाडे लावणे, अशी पावले उचलावी लागणार आहेत. अजून आपण काय करु शकतो
- ओला आणि सुका घरगुती कचरा वेगळा ठेवा, कारण बहुतेक ओला कचरा कंपोस्ट बनवण्यासाठी वापरला जातो आहे.
- विनाकारण मोबाईल फोन आणि इंटरनेट वापरू नका. प्रत्येक वेळी जेव्हा आपण इंटरनेटसाठी क्लिक करतो, तेव्हा आपल्या स्क्रीनवर तो शोध दाखवण्यासाठी कार्य करणारी साधने हरितगृह वायू सोडतात.
- प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करा.
- पेट्रोल-डिझेल कार, बाईक फक्त तेव्हाच वापरा जेव्हा त्याची खूप गरज असेल.
- घरात गरज नसताना बल्ब, दिवे, एसी कोणत्याही परिस्थितीत वापरू नका.