सांगली । बहे (ता.वाळवा) येथील सेवानिवृत्त्त प्राथमिक शिक्षिका श्रीमती खाशीबाई शिवाजीराव पाटील (वय 84) यांचे शुक्रवारी (ता.29 ) वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले,सूना,नातवंडे असा परिवार आहे.जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील यांच्या त्या मावशी तर राजारामबापू कारखान्याचे नॅनो केमिस्ट विभागाचे जयकर पाटील व विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्रा.शशिकांत पाटील यांच्या मातोश्री होत.
दशक्रिया विधी मंगळवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता बहे येथे होणार आहे.तर उत्तरकार्य गुरुवार दि. 5 ऑक्टोबर रोजी इस्लामपूर येथे होणार आहे.