Last Updated on 30 Aug 2023 10:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2024 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर,औरंगाबाद,मुंबई,कोल्हापूर,अमरावती,नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) लेखी परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 22 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे.
वरील कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दि. २८ ऑगस्ट २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सदर इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वीच्या परीक्षा प्रचलित पध्दतीनुसार आयोजित करण्यात येतील याची सर्व कनिष्ठ महाविद्यालये व माध्यमिक शाळा, विद्यार्थी,शिक्षक,पालक व संबंधीत घटकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे.परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा /उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे.अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राहय धरू नये.प्रात्यक्षिक परीक्षा,श्रेणी,तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल.सदर वेळापत्रकांबाबत काही सूचना,हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे 15 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात असेसुद्धा बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. .
दहावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर
दरम्यान, दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.राज्याचा निकाल 29.86 टक्के लागला आहे.निकालात 51.47 टक्क्यांसह लातूर विभाग पहिल्या स्थानावर आहे.तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली.
दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक पाहण्यासाठी
इथे क्लिक करा

डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करा
आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’
डेंग्यू : लक्षणे आणि औषधोपचार
विविध कार्यकारी सोसायट्यांना करता येणार ‘हे’ उद्योग,व्यवसाय; जाणून घ्या
चला पर्यटनाला | निसर्गाचं वरदान : ‘तीर्थक्षेत्र रामलिंग बेट’ बहे
बियांपासून बनवल्या पर्यावरणपूरक राख्या; इस्लामपूरच्या मुक्तांगण स्कूलचा उपक्रम
![]()












































































