Last Updated on 05 Nov 2023 4:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जर आपण नव्या घरासाठी किंवा कार्यालयासाठी प्लॉट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही खास गोष्टी जाणून घेणे अतिशय गरजेचे आहे. आपण कोणत्या आकाराचा प्लॉट घेता हे वास्तूच्या दृष्टीने महत्वाचे असते.
जर आपण घर बांधण्यासाठी नवा प्लॉट खरेदी करत असाल तर काही गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे. केवळ प्लॉट चांगला असणे सुखसमृद्धी मिळवण्यासाठी पुरेसे नसते. तर चांगल्या आकाराचा प्लॉटही वास्तुसंमत घरासाठी महत्वाचा असतो. हे यासाठीचे पहिले पाऊल असते. मात्र पूर्ण लाभ तेव्हाच मिळतो जेव्हा आपण घर बांधताना वास्तूच्या इतर नियमांचेही पालन करता.
1. चौरसाकृती प्लॉट
चौरसाकृती प्लॉटची लांबी आणि रुंदी सारखी असते आणि सर्व कोन हे सारख्याच मापाचे असतात. या प्लॉटवरील घरात राहणाऱ्या लोकांना मानसिक शांती आणि आर्थिक समृद्धी मिळते आणि संपूर्ण कुटुंब सुखी राहते.
2. आयताकार प्लॉट
आयताकार प्लॉटमध्ये समोरासमोरच्या बाजूंचे माप समान असते आणि सर्व कोन 90 अंशाचे असतात. या प्लॉटवरील वास्तू या घरातल्यांसाठी सौभाग्याची दारे उघडतात. मात्र लांबी आणि रुंदीतील फरक हा फार मोठा, म्हणजेच दुप्पटीपेक्षा जास्त नसावा.
3. वर्तुळाकार प्लॉट
वर्तुळाकार प्लॉट हे राहण्यासाठी किंवा कोणत्याही इतर कामासाठी चांगले मानले जात नाहीत. अशा प्लॉटवर घर बांधल्याने फार विपरीत परिणाम होऊ शकतात. वर्तुळाकार प्लॉटवर व्यावसायिक उद्देशाने केलेले बांधकाम काही वेगळ्या परिस्थितींमध्ये लाभदायक असू शकते. हे बांधकाम कशापद्धतीने केले जाते आणि त्याची प्रकृती कशी आहे यावरही हे अवलंबून असते. जर वर्तुळाकार प्लॉटवरील बांधकाम वर्तुळाकार असेल तर ते शुभ ठरू शकते. मात्र घरासाठी हे प्लॉट चांगले नसतात.
4. त्रिकोणाकृती प्लॉट
त्रिकोणाकृती प्लॉटमध्ये राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक नुकसान, मानसिक तणाव आणि दुर्घटना अशा अडचणी येतात. त्यामुळे घर बांधण्यासाठी त्रिकोणाकार प्लॉट खरेदी करू नका.










































































