गौण खनिजाचे उत्खनन व वाहतुकीचे नियंत्रण यासाठी ‘महाखनिज’ ही संगणक प्रणाली
कोल्हापूर | महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या सूचनेनुसार गौण खनिज वाहतूक करणा-या प्रत्येक वाहनांस GPS Device बसवून वाहतुक करण्यास 1 मे 2023 पासून बंधनकारक असल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी दिली आहे.
वाहनांसाठी बसविण्यात येणारे GPS Device हे Automotive Research Association of India (ARAI) द्वारे प्रमाणित Standard 140 (AIS-140 IRNSS) यांचेच असावे. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्यावी. https://mahakhanij.maharashtra.gov.in/GPS Manufacturer List.aspx वाहनमालकाने GPS Device वाहनात बसविल्यानंतर शौर्य टेक्नोसॉफ्ट प्रा.लि. यांच्या (020-67800800) या दुरध्वनीवर संपर्क साधून GPS Device महाखनिज प्रणालीसोबत तात्काळ आपल्या स्तरावर लिंक करून घ्यावे.
गौण खनिज वाहतूक करणा-या प्रत्येक वाहनांस GPS Device बसवून वाहतुक करण्यास दि. 01 में 2023 पासून प्रणाली लागू करण्यात आली आहे. या नंतर गौणखनिज वाहतुक करणाऱ्या कोणत्याही वाहनास महाखनिज प्रणालीमधून E-TP (निर्गत वाहतूक पास) Generate केले जाणार नाहीत व अशा वाहनाने गौण खनिज वाहतूक केल्याचे आढळून आल्यास ते अवैध समजले जाईल.
महसूल यंत्रणेकडून नियुक्त भरारी पथकाकडून निरीक्षणाच्या वेळेस GPS Device शिवाय बिना E-TP गौण खनिजाची वाहतूक करणारी वाहने आढळली तर ती अवैध समजून महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48 (7), ( अन्वये दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे सर्व गौणखनिज खाणपट्टा धारक व खाण परवानाधारक यांनी गौणखनिज वाहतुक करणा-या वाहनास शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणकानुसार GPS Device बसवून गौणखनिज वाहतुक करावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा…
इस्लामपूर शहरात निसर्गाच्या सानिध्यात स्वतःचं घर हवंय…तर येथे करा नोंदणी !