नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, प्रदीप सिंहने अव्वल स्थान पटकावले आहे.लेखी परीक्षा आणि मुलाखतीचा टप्पा पार केल्यानंतर ८२९ जणांची आयोगाने निवड केली आहे.तर जतीन किशोर देशात दुसरा आहे.प्रतिभा वर्मा देशात तिसरी,तर महिला उमेदवारांमध्ये प्रथम आली आहे.महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधराव्या रँकवर आहे. अभिषेक सराफ आठव्या रँकवर आहे.
यंदा या परीक्षेस एकूण ८२९ उमेदवांनी उमेदवारांची निवड झाली आहे. दरवर्षी, लाखो उमेदवार ज्यांना आयएएस, आयपीएस अधिकारी बनण्याची इच्छा असलेले तरुण-तरुणी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देतात. ही परीक्षा देशातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धा परीक्षा मानली जाते. यंदा या निवड झालेल्या उमेदवारांपैकी ३०४ जनरल कॅटेगिरीतील, ७८ EWS, २५१ ओबीसी, १२९ अनुसूचित जाती आणि ६७ अनुसूचित जमाती कॅटेगिरीतील आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या सेवा परीक्षेतून IAS, IPS आणि IFC, भारतीय टपाल सेवा, भारतीय टपाल सेवा, यूपीएससी नागरी सेवांद्वारे भारतीय व्यापार सेवा यासह इतर सेवांसाठी निवड केली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. यात प्रारंभिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात. मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाते.
महाराष्ट्रातील जयंत मंकले या अंध विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत १४३ वा क्रमांक पटकावला आहे. याआधी जयंतने २०१८ मध्येही लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. मात्र त्यावेळी त्याचा ९३७वा क्रमांक होता. त्यामुळे त्यांनी दोन वर्ष अथक परीश्रम करून पुन्हा परीक्षा दिली, आणि यावेळी त्यांना यश आले. २०१८ मध्ये यश न मिळाल्यामुळे एक वर्ष जयंत नैराश्यातही होता.मात्र अभ्यास करून जिद्दीनं यंदा जयंतने १४३ वा क्रमांक मिळवला.२०१५ पासून जयंतने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली.२०१७ मध्ये मुलाखतीपर्यंत जयंत पोहचला होता,मात्र त्याची निवड झाली नाही. अखेर यंदा जयंत १४३ वा रॅंक मिळवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
महाराष्ट्रातील गुणवंत उमेदवारांमध्ये नेहा भोसले (१५), बीड मंदार पत्की (२२), योगेश पाटील (६३), राहुल चव्हाण (१०९), सत्यजित यादव (८०१) यांचा समावेश आहे. सत्यजित यादव मूळचा सांगली जिल्ह्यातील अहिरवाडी येथील निवासी आहे. लोकसत्ताशी बोलताना सत्यजितने परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सत्यजितने आतापर्यंत चार वेळा परीक्षा दिली होती. अखेर पाचव्या प्रयत्नात त्याला यश मिळालं आहे.