Last Updated on 05 Nov 2023 4:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
वॉशिंग्टन । अमेरिकेच्या टेक्सासमधून सर्वांना हादरून टाकणारी बातमी समोर आली आहे.टेक्सासमधील डिमिट येथील साउथ फोर्क डेअरी फार्ममध्ये मंगळवारी भीषण स्फोट झाला.या स्फोटामुळे लागलेल्या आगी 18 हजार गायींचा होरपळून मृत्यू झाला.हा स्फोट इतका भीषण होता की,त्या संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले होते.या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमनदलाच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले. मात्र, तोपर्यंत 18 हजारांहून अधिक गायींचा होरपळून मृत्यू झाला.
सुरक्षेचा प्रश्न विचारात घेता जवळपास असलेल्या शेतांमध्ये जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. दूध काढण्यासाठी सगळ्या गायींना एका ठिकाणी आणण्यात आलं होतं,त्यावेळी स्फोट झाला.
स्फोट होताच आग लागली.त्यानंतर पुढच्या काही मिनिटांत आगीच्या ज्वाळा पसरल्या.आसमंत धुराच्या लोटांनी व्यापला.कॅस्ट्रो काऊंटी शेरीफ कार्यालयानेघटनेचे फोटो शेअर केले आहेत.त्यातून दुर्घटनेची तीव्रता दिसून येत आहे.या दुर्घटनेत मनुष्यहानी झालेली नाही. मात्र तब्बल 18 हजार गायींचा मृत्यू झाला आहे.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहोचले. त्यांनी एका व्यक्तीला वाचवलं. तो दुर्घटनेत जखमी झाला होता. त्याला इमारतीमधून बाहेर काढण्यात आलं. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आगीत मृत्यूमुखी पडलेल्या बहुतांश गायी होलस्टिन आणि जर्सी गायांची संकर असलेल्या प्रजातीच्या होत्या. दुर्घटनेत फार्ममधील 90 टक्के गायींचा मृत्यू झाला. फार्ममधील एका गायीची किंमत सरासरी 2 हजार डॉलर आहे.












































































