सातारा । जन्म व मृत्यू घटनांच्या नोंदणीसाठी शासनाचे शासनाचे crsorgi.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे.
तथापि, काही समाजकंटकांद्वारे फसवी व बनावट संकेतस्थळे तयार करण्यात आली आहेत.यापैकी काही संकेतस्थळे CRSORGIGOOVI.IN, CRSRGIIN, BITHDEATHONLINE.COM या नावाची आहेत. ही संकेतस्थळे भारत सरकारच्या अधिकृत मूळ संकेतस्थळासारखीच आहेत. यावरुन जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे देखील तयार होतात. त्यासाठी नागरिकांकडून ऑनलाईन फोनवरुन मागणी करुन रक्कम घेतली जाते.
नागरिकांनी जन्म अथवा मृत्यू घटनांची नोंदणी करण्यासाठी ग्रामिण भागात ग्रामसेवक, शहरी भागात मुख्याधिकारी नगर परिषद-नगरपंचायत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, कार्यकारी अधिकारी, कटक मंडळे (कॅन्टोनमेन्ट बोर्ड), शासकीय आरोग्य संस्थेचे प्रमुख (जर घटना शासकीय आरोग्य संस्थेत घडली असेल तर) यांचे संपर्क साधावा .नागरिकांनी फसव्या व बनावट संकेतस्थळावर कोणत्याही प्रकारे घटनांची नोंदणी करुन नये अथवा ऑनलाईन रक्कम भरू नये,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा निबंधक जन्म-मृत्यू, जिल्हा परिषद सातारा यांनी केले आहे.