Last Updated on 08 Apr 2023 6:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । समाज घडविण्यात शिक्षक,शाळा आणि समाज माध्यम हे घटक अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात असे प्रतिपादन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केले. .
कासेगाव शिक्षण संस्थेच्या साखराळे येथील मॉडर्न हायस्कुलचे मुख्याध्यापक रविंद्र रघुनाथ बडवे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील होते.कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर.डी. सावंत,राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील,माजी संचालक माणिकराव पाटील,राष्ट्रवादी शिक्षक सेलचे तालुकाध्यक्ष बी.जी.पाटील,सुवर्णाताई पाटील,सरपंच संतोष दमामे,उपसरपंच हणमंत पाटील,साखराळेच्या सरपंच सुजाता डांगे,उपसरपंच बाबुराव पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सचिव आर.डी. सावंत म्हणाले,शिक्षक हा माणूस आणि समाज घडविण्यात महत्वाची भूमिका बजावत असतो,रविंद्र बडवे यांनीही आपली कर्तव्यनिष्ठा पार पाडताना शिक्षक,प्रशासक आणि आदर्श मुख्याध्यापक कसा असावा याचे उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.यावेळी विजय पाटील,माणिकराव पाटील,सुवर्णाताई पाटील,शरयू जोशी,विद्यार्थिनी वेदिका जाधव आदींची भाषणे झाली.
पोलीस पाटील आनंदराव दवणे,टी.आर सलगर,मुख्याध्यापक शरद माळी,अनिल पाटील,ए.व्ही पाटील,लतिका पाटील,शैलजा पाटील,शिवाजी गोंदील,ए.पी.पाटील आदी उपस्थित होते.प्रा.कृष्णा मंडले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.व्ही.ए.मोरे यांनी आभार मानले.विमल कुंभार यांनी सूत्रसंचालन केले.






































































