सांगली । राजारामनगर (ता.वाळवा) येथील महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशनचे उपाध्यक्ष,जेष्ठ साखर कामगार नेते जनार्दन तुकाराम (जे.टी.) थोरात (वय ८२) यांचे वार्धक्याने निधन झाले. ते वाळवा येथील थोरात घराण्यातील असून त्यांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे कामगार प्रतिनिधी संचालक,तसेच वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघ (इंटक) चे दीर्घकाळ अध्यक्षपद भूषविले आहे.त्यांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यात ३२ वर्षे सेवा केली आहे.त्यांना राजकारणाबरोबर धार्मिकतेचा मोठा व्यासंग होता.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,मुलगी,सुना,नातवंडे,भाऊ,बहिण असा परिवार आहे.रक्षाविसर्जन सोमवार दि.१३ मार्च २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता वाळवा येथील कृष्णा नदीच्या तीरावर होणार आहे.फलटण येथील स्वराज् ग्रीन पॉवर अँड फ्युएल युनिटचे जनरल मॅनेंजर विजय थोरात,सामाजिक कार्यकर्ते अजय थोरात यांचे ते वडील होत.