Last Updated on 31 Oct 2022 11:13 AM by Sanjay Patil/Adhorekhit
1990 च्या दशकातील नामवंत संघाचा सहभाग; खेळाडूंचा होणार सन्मान
सांगली । इस्लामपूर क्रिकेट असोसिएशनतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ४० वर्षांवरील टेनिस बॉल क्रिकेट लीग स्पर्धेचा धरार रंगणार आहे.1990 च्या दशकातील इस्लामपूर शहरातील नामवंत संघ या क्रिकेट लीगमध्ये खेळतीलपहिल्या चार क्रमांकांचे विजेते आकर्षक चषकाचे मानकरी असतील.इस्लामपूर शहरातील उरण परिसरातील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर तीन ते सहा नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धा होतील.
इस्लामपूर शहरात ९०च्या दशकात टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. तब्बल ६० हुन अधिक संघ शहरात होते. शहरातील विविध मैदानांवर हजारोंच्या संख्येने मुले क्रिकेट खेळत होती.सध्या क्रिकेटच्या मैदानावर मुले खेळताना दिसतच नाहीत. मैदानी खेळाचे महत्त्व वाढवण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत दहा संघ साखळी पद्धतीने खेळतील. सहा षटकांचे सामने होतील.
या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सीरिज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज फलंदाज, क्षेत्ररक्षक, विकेटकीपर, सर्वोत्कृष्ट झेल अशी वैयक्तिक स्वरूपातील पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जयदीप जाधव, मनोज पवार, संजय भोईटे, विनोद शिंदे, निवास पाटील, सुनील गुरव हे प्रयत्न करीत आहेत.
खेळाडूंचा होणार सन्मान
सनी स्पोर्टस, एम.डी पवार स्पोर्टस, पेप्सी स्पोर्टस, महाडिक स्पोर्टस, इंदिरा स्पोर्टस, जावडेकर स्पोर्टस, छत्रपती स्पोर्टस, शॉर्ट अँड टॉल स्पोर्टस, युनिटी व वाठारकर स्पोर्टस असे दहा संघ या | स्पर्धेत खेळताना दिसतील. ६ नोव्हेंबरला अंतिम सामना होईल. यावेळी शहरातील क्रिकेटचे राष्ट्रीय खेळाडू, आजी-माजी खेळाडू व स्पर्धेतील सहभागी खेळाडूंचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.










































































