Last Updated on 26 Oct 2022 1:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवेखेडला गर्भवतीचे प्रबोधन : अनिष्ठ प्रथेला मंगळवारी दिली मूठमाती
सांगली । अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी येथील सावित्रीच्या लेकीने आज ग्रहणाशी डोळे भिडवले आणि अंधश्रद्धेला छेद दिला.
नवेखेड येथील पूजा ऋषीराज जाधव व ऋषिराज मोहन जाधव या उच्चशिक्षित जोडप्याने पुढाकार घेऊन समाजातील ग्रहण न पाहण्याच्या अनिष्ठ प्रथेला मंगळवारी मूठमाती दिली व समाजासमोर आदर्श ठेवला.पूजा जाधव या चार महिन्यांच्या गर्भवती आहेत!
ग्रहणकाळात भाजी चिरणें,फळे तोडने,अन्न ग्रहण करणे,मांडीवर मांडी घालून बसने वर्ज असते.मात्र हे सर्व करून पूजा जाधव यांनी सोलर चष्म्यातून थेट ग्रहणात काळवंडलेल्या सूर्याशी डोळेही भिडवले.विशेष म्हणजे घरातील सर्व कुटूंबाचे सहकार्य लाभले.पूजा जाधव यांच्या आज्जेसासू शांताबाई जाधव,सासू माजी सरपंच छाया जाधव,सासरे मोहन जाधव,दिर पंकज जाधव, जाऊ प्रियांका जाधव यांचे मोलाची साथ लाभली.
दरम्यान,ग्रहण काळात जे करायचे नाही,ते करून दाखवत,पूजा जाधव यांनी आदर्श निर्माण केला.हा उपक्रम राबवण्यासाठी शंभूराजे प्रतिष्ठान नवेखेड व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहकार्य लाभले,यावेळी प्रा शंकर चव्हाण,बाजीराव ताटे,अंकुश चव्हाण उपस्थित होते.






































































