Last Updated on 12 Oct 2022 11:12 AM by Sanjay Patil/Adhorekhit
World Cup Match in Theatre Live । भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. T20 विश्वचषकादरम्यान क्रिकेटप्रेमी सिनेमागृहात भारताच्या सामन्यांचा आनंद घेऊ शकणार आहेत.INOX च्या मल्टिप्लेक्समध्ये टीम इंडियाचे सामने दाखवले जातील.यासाठी INOX ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (ICC) करार केला आहे. आयनॉक्स लीझर लिमिटेडने मंगळवारी (11 ऑक्टोबर) ही माहिती दिली.
येत्या 23 ऑक्टोबर रोजी भारताचा टी 20 विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तानविरोधात रंगणार आहे.यानंतर भारताचे विश्वचषक स्पर्धेतील सर्व सामन्यांचे आयनॉक्स थिएटरमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे.
करारानुसार भारतीय संघाचे सर्व गट सामने INOX च्या मल्टिप्लेक्समध्ये प्रसारित केले जातील.टीम इंडिया 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.गट सामन्यांव्यतिरिक्त,उपांत्य फेरी आणि अंतिम सामने देखील INOX वर दाखवले जातील. टीम इंडियाचे सर्व सामने देशभरातील 25 हून अधिक शहरांमधील INOX च्या मल्टिप्लेक्समध्ये प्रसारित केले जातील.
ICC पुरुषांच्या T20 विश्वचषकाच्या आठव्या आवृत्तीला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.पहिल्या फेरीनंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर-12 सामने सुरू होतील.अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल.
थिएटरमध्ये क्रिकेटचे स्क्रीनिंग करून,देशातील सर्वात प्रिय खेळ,क्रिकेटसह प्रचंड स्क्रीन अनुभव आणि आवाजाचा थरार एकत्र आणला जाणार आहे. यामुळे T20 चा उत्साह वाढेल.
INOX चे देशात 165 मल्टिप्लेक्स आहेत.यात 74 शहरांमध्ये 705 स्क्रीनवर चित्रपट दाखवले जातात.










































































