Last Updated on 08 Oct 2022 4:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नाशिक । औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटे डंपर-खासगी बसच्या अपघातानंतर बस पेटल्याने 12 जणांचा मृत्यू झाला.यात 38 प्रवासी जखमी झाले आहेत.यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसचा नाशिक येथे अपघात झाला. या बसला आग लागली. ही बस स्लीपर कोच होती. यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसचा नाशिक येथे अपघात झाला.या बसला आग लागली.ही बस स्लीपर कोच होती.
अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून हलविण्यात आली.
अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतल्याचे सांगितले जाते. अपघातग्रस्त बस चिंतामणी ट्रॅव्हलची असल्याची प्राथमिक माहिती आहे. यवतमाळहून ही बस मुंबईला निघाली होती. पहाटे पाचच्या सुमारास पंचवटीतील हॉटेल मिरची चौकात तिला कोळश्याने भरलेल्या डंपरने धडक दिली. अपघातानंतर बसने पेट घेतला. गाठ झोपेत असणारे प्रवाशांचा अक्षरश कोळसा झाला.मृत प्रवाशांचे मृतदेह मनपाच्या सिटीलिंक बसमधून हलविण्यात आले. आगीत बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला.
‘

नागरिकांनी धाव घेत दोन-तीन जणांना वाचवले
यवतमाळहून शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता ही बस निघाली होती. सकाळी सव्वा पाच वाजता ती या चौकात अपघातग्रस्त झाली. 12 व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. आसपासच्या नागरिकांनी धाव घेत दोन-तीन जणांना वाचवले. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे. बस, डंपर व टेम्पो यांच्यात हा विचित्र अपघात झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातस्थळी दिली भेट
औरंगाबाद रस्त्यावर नांदूर नाका येथे आज पहाटे खासगी बसला अपघात झाला.अपघातस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन अपघातग्रस्त बसची पाहणी केली.यावेळी पालकमंत्री दादा भुसे,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.










































































