Last Updated on 30 Sep 2022 7:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । खड्ड्यांमुळे अनेक महामार्गांची दुरवस्था झाली आहे. हे खड्डे संथ वाहतुकीसाठी आणि पर्यायी अपघातांना देखील आमंत्रण देत आहेत.या खड्ड्यांना नागरिक त्रस्त झाले असल्याने त्यांना आता याची तक्रार ही थेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करता येणार आहे.
रस्त्यांवरील आणि महामार्गावरी खड्डे हा नेहमी चर्चिला जाणारा विषय आहे. खड्ड्यांमुळे अनेक आंदोलने झाली आहे. नादूरुस्त रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना त्रास होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर तातडीने कारवाई करण्यात यावी यासाठी टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकाम विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गावर येणाऱ्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक 18002331548 कार्यान्वित करण्यात आला आहे. हा दूरध्वनी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सुरु असणार आहे. नागरिकांना जर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गावर असलेल्या खड्ड्यांबाबत तक्रार नोंदवायची असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे चे सहायक मुख्य अभियंता मिलिंद बारभाई यांनी केले आहे.










































































