सांगली |
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा महोत्सवाच्या अनुषंगाने शिराळा येथे दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8 वाजता शिराळा शहरातील 10 शाळेच्या विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.
या रॅलीमध्ये सुमारे 3 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. या रॅलीचा श्री शिव छत्रपती विद्यालय शिराळा येथील मैदानात समारोप होणार असून सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आकाशात तिरंगी रंगाचे फुगे सोडण्यात येणार आहेत. तसेच या मैदानात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आल्याची माहिती शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिली.