Last Updated on 04 Apr 2022 10:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली |
रविवार दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी सांगली जिल्ह्यात कोरोनाचा नवीन पॉझिटिव्ह रुग्ण नाही.आणि सद्यस्थितीत उपचाराखालील रुग्ण संख्याही शून्यावर आहे.कोरोना महामारीचे संकट सुरू झाल्यापासून सन 2019 पासून अशी स्थिती पहिल्यांदाच आली आहे.
याबद्दल जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्यावतीने आनंद व्यक्त होत आहे.जिल्ह्यात आज अखेर २ लाख ८ हजार 368 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर 5509 रुग्ण मृत्यू पावले आहेत. कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन आणि सर्वच संबंधित यंत्रणा अव्याहतपणे संकटाच्या मुकाबल्यासाठी झटत आहे.
लसीकरणाला जिल्हावासीयांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिल्याने तिसऱ्या लाटेचा आपण व्यवस्थित मुकाबला करू शकलो.त्यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भावही कमी राहिला. यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी नागरिकांचे अभिनंदन केले आहेत.












































































