Last Updated on 25 Sep 2025 4:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील ‘आउट स्टँडिंग परफॉर्मन्स इन शुगर इंडस्ट्री’ या पुरस्काराने सन्मानित
सांगली । महाराष्ट्र,कर्नाटक आणि गुजरात राज्याच्या साखर कारखानदारीमध्ये तांत्रिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दि डेक्कन शुगर टेक्निलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) या संस्थेच्या वतीने राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यास “बेस्ट शुगर फॅक्टरी” पुरस्काराने,तर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रशांत लक्ष्मण पाटील यांना “आउट स्टँडिंग परफॉर्मन्स इन शुगर इंडस्ट्री” या पुरस्काराने पुणे येथील शानदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील,कृषीमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील,मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी हे पुरस्कार स्विकारले.
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचे कुशल मार्गदर्शन,तसेच राजारामबापू साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी, हितचिंतक व अधिकारी-कामगारांच्या योगदानातून आम्ही जी वाटचाल करीत आहोत,त्याचे फलित म्हणजे हे पुरस्कार आहेत. या पुरस्काराने आमची जबाबदारी वाढली असल्याची भावना कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी डेक्कन शुगर टेक्निलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) या संस्थेचे अध्यक्ष एस.बी.भड, उपाध्यक्ष सोहेल शिरगावकर, उपाध्यक्ष एम.के.पटेल (गुजरात), उपाध्यक्ष (तांत्रिक) एस.डी.बोकारे तसेच कारखान्याचे सचिव डी.एम.पाटील, जनरल मॅनेंजर (वर्क्स) विजय मोरे, जनरल मॅनेंजर सुनिल सावंत, सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलाकर, चिफ केमिस्ट (वाटेगाव-सुरूल) संभाजी सावंत, इन्व्हायरमेंट ऑफिसर आर.एस. पाटील, सौ.तेजस्विनी प्रशांत पाटील, कु.आयुस प्रशांत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.










































































