Last Updated on 18 Sep 2025 10:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । ग्राहक संरक्षक कायदे आणि ग्राहकांचे हित याबाबत विद्यार्थ्यांमध्ये सजगता यावी, शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा; असे प्रतिपादन ग्राहक पंचायतीचे मार्गदर्शक आणि बळीराजा संघटनेचे संस्थापक बी.जी. पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कॉमर्स असोसिएशन मार्फत झालेल्या ग्राहक संरक्षण ग्राहक हित या विषयावर झालेल्या मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए.एम.जाधव तर प्रमुख उपस्थिती म्हणून कॉमर्स विभाग प्रमुख प्रा.डॉ. अशोक शिंदे उपस्थित होते. बी.जी.पाटील म्हणाले,ग्राहक संरक्षण कायदा विद्यार्थ्यांनी समजून घ्यावा व शोषण मुक्त समाज निर्माण व्हावा, असे सांगून सार्वजनिक विश्वस्त नियम 1950 कलम 41 क याबद्दल सविस्तर माहिती दिली. प्राचार्य डॉ.ए.एम.जाधव यांनी;ग्राहक हक्कांविषयी तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि दैनंदिन जीवनात या हक्कांचा वापर कसा करता येईल याविषयी माहिती दिली. प्रारंभी प्रा. किरण मेनकुदळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. स्मिता पाटील यांनी सूत्रसंचालन तर प्रा.प्राची कांबळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास बी.कॉम, एम. कॉम, डिप्लोमा इन टॅक्सेशन आणि जुनिअर कॉलेजचे कॉमर्सचे विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.














































































