Last Updated on 03 May 2025 8:08 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कारखान्याचे संचालक बाबासो शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, निवासराव थोरात, सयाजी यादव, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
एम. के. कापूरकर यांनी कामगारांना कर्तव्यनिष्ठा व सामाजिक बांधिलकीची शपथ दिली. यावेळी जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, जनरल मॅनेजर डिस्टीलरी विकास आभाळे, एच. आर. मॅनेजर संदीप भोसले, को- जन मॅनेजर गिरीष इस्लामपूरकर, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, संरक्षण अधिकारी संजय नलवडे, कामगार सोसायटी चेअरमन यासीन संदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.










































































