Last Updated on 08 Mar 2025 9:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
IND vs NZ Final । भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना उद्या रंगणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तब्बल 25 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदासाठी भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ पुन्हा एकदा आमनेसामने भिडणार आहेत. क्रिकेटप्रेमींसाठी हा थरार अविस्मरणीय ठरण्याची शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा फायनल सामना रविवारी दि.9 मार्च रोजी दुबई स्टेडियमवर होणार आहे.
दोन्ही संघ विजयासाठी मैदानात मोठ्या ताकदीने उतरणार असून विजेतेपद मिळावे म्हणून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात महामुकाबला होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. 25 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.
हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 1975 मध्ये खेळला गेला होता. आतापर्यंत दोघांमध्ये 119 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या काळात, भारताने वरचढ कामगिरी केली आहे. भारताने 61 सामने जिंकले आहेत.
न्यूझीलंड संघाने 50 सामने जिंकले आहेत. 7 सामन्यांमध्ये 1 सामना बरोबरीत सुटला आणि निकाल लागला नाही. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा, दोन्ही संघ दुबई क्रिकेट स्टेडियमवर एकमेकांसमोर येतील. गेल्या 10 सामन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भारत खूप पुढे असल्याचे दिसते. गेल्या 10 सामन्यांमध्ये भारताने 6 वेळा आणि न्यूझीलंडने 3 वेळा विजय मिळवला आहे, त्यापैकी एक अनिर्णीत राहिला. तथापि, भारताने त्यांच्या घरच्या मैदानावर सर्व सामने जिंकले.

भारताची संभाव्य प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल , विराट कोहली , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल , केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या , रवींद्र जडेजा , मोहम्मद शमी , कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग 11 : विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन , डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओ’रोर्क.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना कधी, कुठे , किती वाजता?
- दिनांक : 9 मार्च 2025
- वेळ : भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता
- स्थळ : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
अंतिम सामना तुम्ही टीव्हीवर कुठे पाहू शकता?
- TV चॅनेल : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ICC Champions Trophy 2025 Final तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर लाईव्ह पाहू शकता. (हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये समालोचन)
Final Match Live Streaming
- डिजिटल स्ट्रीमिंग : Jio Hotstar ( भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ICC Champions Trophy 2025 Final च्या अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar अॅपवर पाहू शकता.
- रेडिओ : All India Radio (AIR) वर कमेंटरी










































































