Last Updated on 10 Aug 2022 7:40 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ई-पोस्ट ऑफिस पोर्टलद्वारे नागरिक राष्ट्रीय ध्वजाची ऑनलाइन खरेदी करू शकतात
नवी दिल्ली |
देशातील नागरिकांना राष्ट्रीय ध्वज सहज उपलब्ध व्हावा यासाठी, देशभरातील पोस्ट कार्यालये राष्ट्रीय ध्वजांची विक्री रु. 25 दराने करीत आहेत. मोठ्या संख्येने नागरिक ePost Office पोर्टलवर (https://www.epostoffice.gov.in/ProductDetails/Guest_productDetailsProdid=ca6wTEVyMuWlqlgDBTtyTw== ). ऑनलाइन ऑर्डर देत आहेत.
कोणतेही डिलिव्हरी शुल्क न घेता, देशातील कोणत्याही पत्त्यावर पोस्ट विभाग हे ध्वज वितरित करत आहे. ऑनलाइन ऑर्डर केलेल्या राष्ट्रध्वजांची वेळेवर डिलिव्हरी व्हावी यासाठी नागरिकांनी 12 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्रीपूर्वी ऑनलाइन ऑर्डर द्यावी, अशी विनंती पोस्ट विभागाने केली आहे.










































































