Last Updated on 05 Nov 2023 6:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली : कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालयाने सन २०२१-२२ या हंगामात मुख्य खरीप पिकांच्या उत्पादनाचा प्राथमिक आगाऊ अंदाज जारी केला आहे. मुख्य खरिप पिकांच्या उत्पादनाबाबत जाहीर केलेल्या अनुमानानुसार २०२१-२२ या कालावधीत देशात ऊसाचे एकूण उत्पादन ४१९.२५ मिलियन टन होईल असा अंदाज आहे.
२०२१-२२ या कालावधीतील उसाचे उत्पादन ३६२.०७ मिलियन टन सरासरी ऊस उत्पादनाच्या तुलनेत ५७.१८ मिलियन टनाने अधिक आहे. केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, खरीप हंगामात खाद्यान्नाचे उच्चांकी १५०.५० मिलियन टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी आपल्या अथक परिश्रमाने, संशोधकांचे कौशल्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ झाली आहे.










































































