Last Updated on 14 Nov 2023 10:10 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । ऊसदर प्रश्नी माजी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन पेटले असतानाच दुसऱ्याबाजूला त्यांच्या आंदोलनावर टीकाही होताना दिसत आहे.गेल्या चार वर्षात राजू शेट्टी कुठे होते असाही सवाल उपस्थित केला जात आहे.दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. राहुल आवाडे यांचा स्वाभिमानी दूध दराबाबतचा समाज माध्यमात प्रसारित झालेला व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून असा सवालही यात उपस्थित करण्यात आला आहे.
गत वर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रुपये दुसरा हप्ता मिळावा.चालु ऊसाला प्रतिटन ३५०० रूपये उचल मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रामुख्याने सांगली,कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठ – दहा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठीकठिकाणी ऊस वाहतूक रोखून धरली.काही वाहनांच्या टायरमधील हवा सोडली.तर काही ठिकाणी ऊसतोडी बंद पाडल्या.काही ठिकाणी वाहने जाळण्याचे प्रकारही घडले. कारखानदार व शेतकरी संघटना यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे.ऊसदर आंदोलन पेटले आहे.
दुसऱ्याबाजूला कारखानदारांनी काही ठिकाणी विरोधाला न जुमानता ऊसतोडी सुरूच ठेवल्या आहेत.गेल्या चार वर्षात राजू शेट्टी कुठे होते असाही सवाल काहींकडून उपस्थित केला जात आहे.दरम्यान,डॉ. राहुल आवाडे यांचा स्वाभिमानी दूध संघाच्या दराबाबतचा समाज माध्यमात प्रसारित झालेला व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून असा सवालही यात उपस्थित करण्यात आला आहे.राजू शेट्टी साहेब, आपल्याला माझा एकच प्रश्न आहे त्यावेळी शासनाने आपल्याला गाईच्या दुधाचा मिनिमम दर 34 रुपये घालून दिला आहे.पण आपण तो 33 रुपयांनी घेताय त्याची आपल्या दूध संघाच्या त्या दर पत्रकामध्ये लेखी नोंद आहे. त्याबद्दल आपलं काय मत आहे? त्याबद्दल स्पष्टीकरण देणार आहे का नाही ? का अशीच लूट होणार आहे? असा सवालही डॉ आवाडे यांनी या व्हायरल व्हिडीओमध्ये उपस्थित केला आहे.
डॉ. राहुल आवाडे यांनी उपस्थित केलेले मुद्धे जसेच्यातसे असे :
नमस्कार, काल मी राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या स्वाभिमानी दूध डेअरीच्या गायीच्या दुधाबद्दल दुधाच्या दराबद्दल मी बोललो.शासनाने गायीच्या दुधाबद्दल दराचा निर्णय माझ्याकडे जीआर14 जुलै 2023 याच्यामध्ये शासनाने क्लीअर नमूद केलेले शासन निर्णयामध्ये 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफचा 34रुपये किमान दर दूध उत्पादकांना त्या ठिकाणी द्यावा असं शासनाने निर्णय घेतला आहे.आणि त्या निर्णयाच्या विरोधात मी बोलताना
राजू शेट्टी साहेब कोल्हापूर परिसरात गाईचे दूध जे संकलित होतं त्या दुधाचा दर दोन रुपये कमी देतात असं मी बोललो. मी बोलल्यानंतर बऱ्याच सोशल मीडियावर त्याबद्दल प्रतिक्रिया आल्या स्पष्टीकरण आलं आणि स्पष्टीकरण देत असत माझ्याकडं स्वाभिमानी दूध डेअरीचे संकलन अधिकारी प्रदीप खोत आणि एमडी महावीर पाटील यांच्या सहीचा माझ्याकडे त्यांचे दरपत्रक आहे.त्यात त्यांचा दर 3.5 फॅटचा आणि 8.5 एस.एन.एफचा त्यांनी 33 रुपये असा लेखी दिला आहे.राजू शेट्टी साहेब, आपण ज्यावेळी उसाचं आंदोलन करता…शेतकऱ्यांना एकरकमी विनाकपात एफआरपी मिळाला पाहिजे असा तुमचा
कायम आग्रह असतो आंदोलन असते.परंतु तुमच्याच दूध डेअरी मधून ज्यावेळी गाईचे दूध संकलित केले जाते.संकलित केल्या जातात शासनाने त्याच्याबद्दल लेखी निर्णय सुद्धा दिला आहे त्यात त्यांनी 34 रुपये दर घालून दिलाय मग तुम्ही 33 रुपयांनी का घेता मग हा शेतकरी आणि दूध उत्पादकांवरती अन्याय नाही का?…याच्यामुळेच तुमचे दूध आंदोलन बंद पडले आहे का? तुम्ही आता हे दूध आंदोलन करत नाही का…हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. राजू शेट्टी साहेब आपल्याला माझा एकच प्रश्न आहे त्या वेळी शासनाने आपल्याला गाईच्या दुधाचा मिनिमम दर 34 रुपये घालून दिला आहे.पण आपण तो 33 रुपयांनी घेताय त्याची आपल्या दूध संघाच्या त्या दर पत्रकामध्ये लेखी नोंद आहे. त्याबद्दल आपलं काय मत
आहे? त्याबद्दल स्पष्टीकरण देणार आहे का नाही ? का अशीच लूट होणार आहे?
म्हणजे असं झालं स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून..










































































