Last Updated on 26 Oct 2022 1:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूरकरांनी दिली सूर्यग्रहण काळातील अंधश्रद्धेला मूठमाती
सांगली । इस्लामपूर येथील दत्त टेकडीवर इस्लामपूरकरांनी खंडग्रास सूर्यग्रहणाचा विलोभनीय नजारा अनुभवला.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने खंडग्रास सूर्यग्रहणाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन कतरण्यात आले होते.
उपस्थितांना सौर चष्म्याच्या माध्यमातून हा नजारा दाखविण्यात आला.तसेच यावेळी खगोल अभ्यासक डॉ. नितीन शिंदे, सुरज उर्मिला आणि भूषण जाधव यांनी ग्रहणासंबंधी समज – गैरसमज याविषयी मार्गदर्शन केले.
ग्रहण काळात अन्न वर्ज केले जाते,पण यावेळी उपस्थितांनी दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला आणि अंधश्रद्धांना दूर करण्याचा छोटासा प्रयत्न केला.
ग्रहण हे पाहण्यासाठी असते पाळण्यासाठी नाही,याची प्रचिती सर्वांनी घेतली.कार्यक्रमाचे संयोजन निलेश कुडाळकर,अभिषेक माळी,निखिल शिंदे यांनी केले.










































































