Last Updated on 29 Sep 2022 1:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit

सांगली | एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सामूहिक शेततळे हा घटक फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे व दुष्काळी भागामध्ये फलोत्पादन पिकाच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करणे या उद्देशाने 100 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे.
या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सिंचन सुविधा या घटकाखाली अर्ज करावेत.
अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
सामूहिक शेततळे घटकासाठी आकारमाननिहाय फलोत्पादन क्षेत्र व देय अनुदान पुढीलप्रमाणे. 34 x 34 x4.70 मीटर आकारमानाच्या सामूहिक शेततळ्यासाठी 2 ते 5 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त फलोत्पादन क्षेत्राकरीता 3 लाख 39 हजार रूपये तर 24 x 24 x 4 मीटर आकारमानाच्या सामूहिक शेततळ्यासाठी 1 ते 2 हेक्टर फलोत्पादन क्षेत्राकरीता 1 लाख 75 हजार रूपये इतके अनुदान आहे.

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण घटकासाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सांगली | एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण हा घटक पाण्याचा साठा निर्माण करणे व साठविलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये तसेच पाणीटंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने 50 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनेतून शेततळे खोदकाम केले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना शेततळ्याच्या आकारमाननिहाय अनुदान देय आहे. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सिंचन सुविधा या घटकाखाली अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या घटकासाठी शेततळ्याच्या आकारमाननिहाय 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त देय अनुदान पुढीलप्रमाणे. 15 x 15 x3 मीटर – 28 हजार 275 रूपये, 20 x 15 x3 मीटर – 31 हजार 598 रूपये, 20 x 20 x3 मीटर – 41 हजार 218 रूपये, 25 x 20 x3 मीटर – 49 हजार 671 रूपये, 25 x 25 x3 मीटर – 58 हजार 700 रूपये, 30 x 25 x3 मीटर – 67 हजार 728 रूपये. 30 x 30 x3 मीटर – 75 हजार रूपये.
Post Views: 1,291