Last Updated on 25 Jun 2023 9:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
हरकती व सूचना 3 जुलै पर्यंत दाखल करता येणार
सांगली । राज्य निवडणूक आयोगाने सांगली जिल्ह्यातील 86 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.त्यानुसार ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप, “नमूना ब” दि. 26 जून २०२३ रोजी सर्व ग्रामपंचायत,तलाठी कार्यालय,गट विकास अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय स्तरावर तसेच NIC Website वर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
प्रभाग निहाय आरक्षण निश्चिती प्रारूप, “नमूना ब” बाबत हरकती व सुचना, संबधीत तहसिलदार यांच्याकडे कार्यालयीन वेळेत दि. 27 जून 2023 ते दि.03 जुलै 2023 या कालावधीमध्ये दाखल करता येतील. हरकतींवर संबंधित उपविभागीय स्तरावर दिनांक 7 जुलै 2023 रोजी अभिप्राय घेण्यात येवून त्यास दिनांक 12 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर मान्यता देवून त्यानुसार अंतिम आरक्षण परिशिष्ट 16 “नमूना अ” दिनांक 14 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे प्रभारी उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. विकास खरात यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे. मिरज – का.खोतवाडी, निलजी, बामणी, वाजेगाव. तासगाव – चिखलगोठण, बिरणवाडी. जत – गुलगुंजनाळ, को. बोबलाद, कोणबर्गी, बिळूर, खिलारवाडी. कवठेमहांकाळ – बसाप्पाचीवाडी, दुधेभावी, गर्जेवाडी, करलहट्टी, पिंपळवाडी, रामपूरवाडी, देशिंग, धुळगाव, घोरपडी, करोली टी, कोकळे, शिंदेवाडी (जी), ढोलेवाडी, ढालगाव, कदमवाडी, कुंडलापूर, मोरगाव, जाधववाडी, झुरेवाडी. खानापूर-विटा – देवनगर, भेंडवडे, साळशिंगे. आटपाडी – नेलकरंजी, वाक्षेवाडी, काळेवाडी, मानेवाडी, मासाळवाडी, मिटकी, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, बनपुरी, करगणी, मुढेवाडी, निंबवडे, पूजारवाडी आ., विभूतवाडी, औटेवाडी, कानकात्रेवाडी. पलूस – राडेवाडी, आमणापूर, विठ्ठलवाडी. वाळवा – तांबवे, शिरटे, साटपेवाडी, कारंदवाडी. कडेगाव – वाजेगाव, चिंचणी वांगी. शिराळा – बांबवडे, वाकुर्डे बु., भाटशिरगाव, धसवाडी, करुगली, खुजगांव, मादळगाव, रांजणवाडी, रिळे, शिरशी, आंबेवाडी, बेलेवाडी, फकीरवाडी, खराळे, कुसाईवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, चिखलवाडी, अस्वलेवाडी, चिंचेवाडी, इंगरूळ, कुसळेवाडी, मराठेवाडी, मेणी, मोरेवाडी, पं.त. वारूण, पाचगणी, मानेवाडी, कदमवाडी.












































































