Last Updated on 30 Nov 2024 6:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या आदेशानं सांगलीत जात पडताळणी समित्यांमध्ये विशेष मोहीम राबवून जात वैधता प्रमाणपत्राचे यथाशीघ्र निर्गमन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने सांगली जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मागील पंधरा दिवसांमध्ये विशेष मोहीम राबवून जवळपास दोन हजार जात वैधता प्रमाणपत्र वितरित केली आहेत.
ही मोहीम ६ डिसेंबरपर्यंत राबवली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांनी दिली.










































































