Last Updated on 14 Sep 2023 9:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । सांगली जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत 14 वर्षाखालील वयोगटात इस्लामपूर हायस्कूलची जलतरणपटू रिया विनोद मोहिते हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ती या स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करेल.
सांगली येथे जिल्हा क्रीडा संकुलाच्या जलतरण तलावात स्पर्धा झाली.
फ्रीस्टाइल ५० मीटर क्रीडा प्रकारात रियाने यश मिळवले.जलतरण स्पर्धेत यश मिळवणारी रिया ही इस्लामपूर हायस्कूलची पहिली खेळाडू ठरली आहे.महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक संचनालायाच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध गटात जलतरण स्पर्धा झाल्या.
तिला शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एन. तलबार क्रीडा शिक्षक वैभव कुलकर्णी,पी.आर.माने यांनी तिचे अभिनंदन केले.रियाला तीचे प्रशिक्षक रामचंद्र शेवडे,आई वडील वर्षाराणी व विनोद मोहिते,आजी निवृत्त मुख्याध्यापिका सरोजनी मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.







































































