Last Updated on 04 Aug 2025 5:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत शिराळा तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी शशिकांत सूर्यवंशी यांनी कबड्डी या खेळात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हेही वाचा – QR कोड स्कॅन करा… थेट तहसीलदारांशी संपर्क साधा
विभागीय आयुक्तालय येथे महसूल सप्ताहाचा शुभारंभ झाला. त्यावेळी हा सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार चेतन तुपे, बापुसाहेब पठारे, शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे आदी उपस्थित होते. तसेच विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी उपस्थित होते.












































































