Last Updated on 16 Jan 2025 10:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी बातमी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांसाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. विद्यमान सातव्या वेतन आयोगाचा कालावधी पुढच्या वर्षी संपणार आहे. तोपर्यंत या वेतन आयोगाच्या शिफारसी प्राप्त होतील, असे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संगीतले.
आयोगाचे अध्यक्ष आणि २ सदस्यांची नेमणूक लवकरच होईल, असंही ते म्हणाले. हा आयोग 2026 पर्यंत स्थापन केला जाईल. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी यापूर्वीच लागू केल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. केंद्र सरकार ज्या दिवसापासून या वेतन आयोगाची अंमलबजावणी करेल त्यादिवसापासून राज्यातही याची अंमलबजावणी करण्याची मागणी महासंघानं केली आहे. दरम्यान, श्रीहरीकोटा इथं सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरं लाँच पॅड उभारायलाही केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. चंद्रावर मानव पाठवण्याच्या इस्रोच्या आगामी मोहिमांसाठी याचा वापर होईल.
हॅशटॅग:
#MaharashtraUpdates, #ताज्या_बातम्या, #अधोरेखित, #NewsPortal
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Oct 2026 9:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit आणखी चाळीस तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश, परीक्षा शुल्क सरसकट माफ होणार पिण्याचे पाणी, चाऱ्याची उपलब्धतेबाबत नियोजन; शेतकऱ्यांकडून वसूली... Read more








































































