Last Updated on 04 Mar 2024 2:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
चांदोली धरण परिसरात बुथ अध्यक्षांशी संवाद
सांगली । सध्याची लढाई निकराची आहे.ही लढाई केवळ राजकीय नसून ती वैचारिक,सामाजिक ही आहे.आपणास उपलब्ध आयुध्यानिशी निकराची झुंज द्यायची आहे. या लढाईमध्ये बुथ अध्यक्षांची भूमिका शिवबांच्या मावळ्यां ची असल्याची भावना युवा नेते,राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी बुथ अध्यक्षांच्या प्रशिक्षण शिबिरात बोलताना व्यक्त केली.
या शिबिरास युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी भेट देवून मार्गदर्शन केले.
चांदोली धरण आणि निर्सगाच्या कुशीत वसलेल्या चांदोली रिसॉर्टमध्ये प्रतीक पाटील यांनी इस्लामपूर,आष्टा शहरासह तालुक्यातील बुथ अध्यक्षांशी संवाद करून कामाचा आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने एका दिवसाचे बुथ अध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात स्वाभिमानी आणि पुरोगामी विचारांचे मंथन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांच्या स्वागत व प्रास्ताविक भाषणाने पहिल्या सत्राची सुरुवात करण्यात आली. विपुल धनगर या युवा वक्ताने ‘महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण’या विषयावर बोलताना ते तुम्हास हिंदू-मुस्लिम,राम मंदीर सांगतील, तुम्ही त्यांना लोकशाही,संसद आणि राज्य घटना सांगा असे आवाहन केले. तर अनिकेत म्हस्के या दुसऱ्या युवा वक्ताने ‘सोशल मिडीयाचा किती प्रभावी वापर करू शकतो याबद्दल माहिती दिली. तसेच महेंद्र शेवाळे यांनी सार्वजनिक क्षेत्रात काम करताना संघटनेचे महत्व पटवून दिले. सोशल मिडीया चे संदीप माळी यांनी बुथ बांधणी ऍपची माहिती दिली.
माजी नगराध्यक्ष अँड.चिमण डांगे,माजी उप नगराध्यक्ष दादासाहेब पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,शहराध्यक्ष शहाजी पाटील,माजी नगरसेवक खंडेराव जाधव,विश्वनाथ डांगे, नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील,अरुण कांबळे, शंकरराव चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी,तसेच बुथ अध्यक्ष उपस्थित होते.
युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,कार्याध्यक्ष देवराज देशमुख,इस्लामपूर शहराध्यक्ष दिग्विजय पाटील,आष्टा शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले,सोशल मिडिया तालुकाध्यक्ष सुशांत कोळेकर,अभिजित रासकर,अभिजित कुर्लेकर,सुशांत कुऱ्हाडे,स्वरूप मोरे,अभिमन्यू क्षीरसागर,सूरज कचरे यांच्यासह युवक कार्यकर्त्यांनी शिबिराचे उत्तम संयोजन केले होते.
स्व.बापूंच्या आठवणींना उजाळा
लोकनेते राजारामबापू पाटील यांनी कासेगाव (ता.वाळवा) येथील सर्वोदय वस्ती गृहात सातत्याने अभ्यास शिबिरे घेऊन संपूर्ण राज्यात वैचारिक बांधिलकी मानणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. प्रतिकदादा पाटीलही स्व.बापूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत युवकांच्यासाठी सातत्याने प्रशिक्षण शिबिरे घेत आहेत. त्यांचे युवा वर्गातून जोरदार स्वागत केले जात आहे.










































































