Last Updated on 26 Oct 2023 6:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । देशात वाढत चाललेली बेकारी आणि महागाई हे चिंतेचे विषय आहेत. सत्ताधारी मंडळी जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी समाजात दुही आणि द्वेष पसरवित असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील कार्यक्रमात बोलताना केली.किल्लेमच्छिंद्रगड हे राज्यातील एक आदर्श पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे आपले काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
आ.पाटील यांच्या हस्ते किल्लेमच्छिंद्रगड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नूतन इमारतीसह मारुती मंदीराच्या सभा मंडपाचे,गोपाळ समाजासाठी बांधण्यात आलेल्या समाज मंदीराचे उदघाटन करण्यात आले. सरपंच वैशालीताई साळुंखे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,राजारामबापू बँकेचे संचालक संजय पाटील,बाजार समितीचे संचालक आबासाहेब पाटील,माजी पं.स.सदस्य सुनील पोळ,माजी सदस्या विजया पोळ,तालुका आरोग्यधिकारी डॉ.साकेत पाटील,डॉ. प्रकाश वाठारकर प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील पुढे म्हणाले,ग्रामपंचायतीला जे झाले,ते विसरून जावून गावाच्या विकासा साठी एकसंघपणे काम करा. आजपर्यंत तुम्ही जे मागितले,ते मी दिले आहे.शिवाजी पुतळा ते खंडोबा मंदीर रस्ता,गडावरील सभामंडप मंजूर आहे. काही कामांची प्रशासकीय पातळीवर पुर्तता करण्याचे काम सुरू आहे.
विधानसभा,लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत.विरोधक जाती-धर्माच्या नावाखाली भांडणे लावून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.येणारी निवडणूक ही पुरोगामी विचारांच्या अस्तित्वा ची लढाई असणार आहे. त्यासाठी प्रतिगामी शक्तींना रोखण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा.
यावेळी शशिकांत साळुंखे,उपसरपंच बाळासो जाधव,रवींद्र मोरे,शिवाजी मोरे,राहुल निकम,संभाजी मदने,अनिल जाधव,सतीश मोरे,अनिल थोरात,धनाजी साळुंखे,दादासो कांबळे,सिकंदर जमादार,गणी सय्यद,नंदकुमार जाधव,मारुती मोरे,हारून शिकलगार,कृष्णत इंगवले,दिनकर कदम,अक्षय हणमंतराव मोरे,संपतराव डुबल,भारती तांबवे,रेखा कदम यांच्यासह ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी तानाजी यादव यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल जगताप यांनी आभार मानले.








































































