Last Updated on 18 Jul 2024 9:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । बीसीसीआयने गुरुवारी श्रीलंका दौऱ्यासाठी टी-20 आणि एकदिवसीय संघाची घोषणा केली. टी-20 ची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. रोहित शर्मा वनडे संघाची कमान सांभाळणार आहे. या संघात विराट कोहलीचाही समावेश आहे.
टीम इंडिया श्रीलंकेत 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला सामना 27 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता पल्लेकेले येथे होणार आहे. एकदिवसीय मालिका 2 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये सुरू होणार आहे.
भारतीय संघाने शेवटचा श्रीलंकेचा दौरा 2021 मध्ये केला होता. संघाने 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळली. तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. टी-20 मालिकेत भारताला 2-1 ने पराभवाला सामोरे जावे लागले.
T20I संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल,रिंकू सिंग,रियान पराग,ऋषभ पंत (य़ष्टीरक्षक),संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे,अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर,रवी बिश्नोनी,अर्शदीप सिंग,खलील अहमद,मोहम्मद सिराज.
एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
भारत- श्रीलंका टी-20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-20 सामना: 26 जुलै 2024
दुसरा टी-20 सामना: 27 जुलै 2024
तिसरा टी-20 सामना: 29 जुलै 2024
भारत- श्रीलंका एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना: 01 ऑगस्ट 2024
दुसरा एकदिवसीय सामना: 04 ऑगस्ट 2024
तिसरा एकदिवसीय सामना: 07 ऑगस्ट 2024












































































