Last Updated on 29 Oct 2022 8:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन
खेड | खेड तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासह, विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी कृषी राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी ( दि. ३०) सकाळी दहा वाजता काळूस (ता. खेड) येथे शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वस्ताद दौंडकर यांनी दिली.
या मेळाव्यात खेड मधील सेझबाधित शेतकऱ्यांचा पंधरा टक्के परताव्याचा प्रश्न गेली १४ वर्षे पासून प्रलंबित, काळुस भागातील चासकमान पुनर्वसन अंतर्गत टाकलेले सात बारा वरील शिक्के काढण्याची मागणी, ४० वर्षांपासून प्रलंबित चाकण पट्टयातील भामा आसखेड पुनर्वसन अंतर्गत टाकलेले शिक्के काढणे, ३० वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न अशा प्रलंबित विविध प्रश्नां संदर्भात शेतकऱ्यांनी संघटित होऊन शासना पर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यात रयत क्रांती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. काळूस येथील श्री राम मंदिर सभा मंडपात मेळावा होत आहे. यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटना राज्य प्रवक्ते गजानन गांडेकर, शेतकरी संघटना खेड तालुका अध्यक्ष सुभाषराव पवळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना वस्ताद दौंडकर, युवक अध्यक्ष संघटना सुनील पोटवडे, युवा अध्यक्ष अमोल मोहिते, उद्योजक गणेश शिंदे, विश्वनाथ पोटवडे, भरतभाऊ आरगडे, बाळासाहेब खलाटे, विठ्ठलसेट आरगडे, अॅड सुनील लिमगुडे, बाळासाहेब साकोरे, माजी पंचायत समिती सदस्य सुदामराव माशेरे, मोहनशेठ दौंडकर, संतोष दौंडकर, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, काशिनाथ हजारे, भानुदास नेटके, उत्तमराव कान्हूरकर, निलेश म्हसाडे, ओंकार कान्हूरकर, विश्वास कदम, दत्ताप्पा साकोरे, विलास थिटे, ऋषिकेश चव्हाण, सुदामराव शिंदे, भीमसेन गोरडे, एकनाथ गोरडे आदी संयोजन करीत आहेत. काळूस मेळावा रयत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य व शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, खेड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
या शेतकरी मेळाव्याच्या धोरणात दलाला पासून शेतकऱ्यांना वाचवूया, जमिनी आपल्या सुरक्षित राखूया हे धोरण आहे. त्याप्रमाणे आपल्या न्याय हक्कासाठी सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गाडेकर यांनी केले आहे.










































































