Last Updated on 24 Nov 2023 11:34 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राज्य शासनाने दिनांक २४ जुलै २०२३ रोजी काढलेल्या दूध दर परिपत्रकाप्रमाणे सहकारी व खासगी दूध संघ दूध उत्पादकांना दर देत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. आज राज्यभर दिनांक २४ जुलै २०२३ रोजी काढलेल्या दूध दर परीपत्रकाची रेठरेधरण (ता. वाळवा) येथे शेतकरी बांधवांना सोबत घेऊन होळी करण्यात आली.
शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर राज्यामध्ये दूध आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.
यावेळी डी.के. पाटील,युवा नेते अमोल पाटील, सरपंच संदीप खोत,प्रशांत पाटील,सुहास पाटील,महादेव खोत,योगेश शिंगाडे व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































































